विशेष मुलांसाठी रंग बरसे.
रंग बरसे भीगे चुनरवाली.... खंडेरायाच्या लग्नाला.... ब्राझील..... सैराट... अशी धमाल गाणी, पाण्याचे , नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक रंगाची मुक्त उधळण, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी यांच्यासोबत नृत्य करताना विशेष मुले आज रंगून गेली होती...

निमित्त होते भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग बरसे या रंग महोत्सवाचे. भोई प्रतिस्थान च्या वतीने दरवर्षी विशेष मुलांसाठी रंग बरसे हा रंग महोत्सव धुलेवंदन निमित्त आयोजित करण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे 31 वे वर्ष होते.
विशेष मुले, अंध मुले, मूकबधिर मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले, डोंबारी खेळ करणारी मुले, देवदासी भगिनींची मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले अशा विविध क्षेत्रातील अडीच हजार बालमित्रांनी धमाल केली.
त्यांच्या स्वागतासाठी पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग, पोलीस बँड ,नाष्टा आणि स्नेहभोजन, पिचकारी असा पूर्ण लावाजामा होता. त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर नृत्य, पाण्याचे फवारे यामध्ये नाचताना ही मुले हरकून गेली होती.. या मुलांबरोबर आपला मोठेपणा विसरून खा.डॉ. मेधा कुलकर्णी, महापौर सौ मंजुषा नागपूरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ उद्योजक नरेश मित्तल, कृष्णकुमार गोयल , डॉ. संजय चोरडिया, डॉ.नंदकिशोर बोरसे, विविध पक्षांचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी ,पोलीस अधिकारी आदी क्षेत्रातील मान्यवर महोत्सवात खेळताना स्वतःच्याच बालपणात रमले होते.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजना मागची भूमिका स्पष्ट करताना , विशेष मुलांचे आयुष्यात आनंदाचे, उत्साहाचे , मांगल्यआचे रंग भरण्यासाठी गेली 31 वर्ष हा उपक्रम भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असल्याची माहिती या प्रसंगी दिली.
नेक्स्ट जेन मूकबधिर मुलांची संस्था, ज्ञान गंगोत्री मतिमंद मुलांची संस्था, अस्तित्व गुरुकुल ,समर्पण संस्था, एनेबलर फाउंडेशन दिव्यांग मुलांची संस्था, बचपन वर्ल्ड फोरम, वंचित विकास, वाघमोडे प्रतिष्ठान, अलका फाउंडेशन, अक्षर स्पर्श, जिजाऊ फाउंडेशन, कसबा संस्कार केंद्र ,पर्वती दर्शन बालसंस्कार केंद्र, सूर्योदय सोशल फाउंडेशन, आयडेंटिटी फाउंडेशन, स्वाधार संस्था , अलका फाउंडेशन, वंचित विकास , श्री संत गजानन महाराज शिक्षण संस्था, अनिकेत सेवाभावी संस्था या संस्थांमधील बालगोपाळांनी यामध्ये सहभागी होऊन धुलीवंदनाचा आनंद लुटला.
( स्थळ -टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान हॉटेल शांताई समोर पुणे, )