पिंपरी-चिंचवडमध्ये 41वा PSPB इंटर-युनिट हॉकी स्पर्धेचा जल्लोष
पुणे | मार्च 2026
भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला प्रोत्साहन देण्यासाठी Bharat Petroleum Corporation Limited तर्फे 41वा PSPB इंटर-युनिट हॉकी टूर्नामेंट दि. 5 ते 8 मार्च 2026 दरम्यान Major Dhyan Chand Polygrass Hockey Stadium येथे आयोजित करण्यात आला आहे.

Petroleum Sports Promotion Board (PSPB) च्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या (PSU) हॉकी संघांचा सहभाग असणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले अनेक खेळाडू मैदानात उतरणार असून प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन Deepak Jain, CGM – स्पोर्ट्स, BPCL यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून आधुनिक आणि व्यावसायिक पद्धतीने हा क्रीडा सोहळा आयोजित केला जात आहे.
हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाला चालना देत सार्वजनिक क्षेत्रातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे.
स्पर्धेचा भव्य समारोप 8 मार्च रोजी पार पडणार असून विजेत्या संघांचा गौरव करण्यात येणार आहे.