सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
  • मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
  • राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
 विश्लेषण

जागतिक महिला दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

MSK    08-03-2026 16:48:26

जागतिक महिला दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

जागतिक महिला दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या आरोग्य विभाग, लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (ससाणे नगर) आणि गॅलॅक्सी पॅथॉलॉजी सेंटर (हडपसर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची मोफत हिमोग्लोबिन तसेच कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) तपासणी करण्यात आली. एकूण १७८ विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७ टक्के विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले, ही चिंताजनक बाब असून संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना याबाबत माहिती देऊन लवकरच विद्यार्थिनी व पालकांसाठी मुलींच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले .

तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल पानसरे आणि जनरल फिजिशियन डॉ. प्रसाद जोगदंड यांनी उपस्थित विद्यार्थिनींना वैद्यकीय सल्ला देत हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक आहार, औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी विद्यार्थिनींना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. या शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. शरद गिरमकर यांनी काम पाहिले, तर उद्घाटन कार्यक्रमाचे आभार डॉ. महेश जोशी यांनी मानले.

शिबिरातील तपासणीसाठी लाईफ केअर हॉस्पिटल व गॅलॅक्सी पॅथॉलॉजी सेंटरचे पॅथॉलॉजी तंत्रज्ञ डॉ. सचिन निघणे, श्री. उज्वल अहिरे तसेच श्रीमती सुहाना, श्रीमती नूतन, श्रीमती अपेक्षा व श्रीमती प्रतीक्षा यांनी सहकार्य केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागातील डॉ. शशिकला वाल्मिकी, सौ. कल्पना गिरमकर, प्रा. शिल्पा गायकवाड, सौ. आरती पवार, सौ. कल्याणी भामरे, सौ. विजयश्री सिद्धेश्वर, प्रा. निकिता मदने, सौ. जयश्री अवचर, डॉ. सुनिता खेडेकर, सौ. रेखा शिंदे, श्री. नारायण खोमणे तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती