सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इस्रायलची गुप्त नजर, सीसीटीव्ही ते मोबाईल नेटवर्कवर पकड; अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा
 विश्लेषण

ऑस्टोनीया रॉयल सोसायटीत जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा;महिला दिनानिमित्त ‘स्त्री-पुरुष समानता’चा संदेश देणारा कार्यक्रम

डिजिटल पुणे    09-03-2026 11:45:43

 पुणे : ऑस्टोनीया रॉयल सोसायटी येथील जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.दि. ८ मार्च २०२६ रोजी जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ, ऑस्टोनीया रॉयल सोसायटी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. बाठेताई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी दिवंगत अजीत दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर संस्थेतील जानेवारी ते मार्च या कालावधीत वाढदिवस असलेल्या एकूण ११ सदस्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पुढे महिला सदस्यांनी ‘चला जाऊ उत्तराखंड’ ही विनोदी नाटिका सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

यावेळी ऑस्टोनीया रॉयल सोसायटीच्या रहिवासी डॉ. प्राजक्ता दुर्गाडे या जि.प. पुणे अंतर्गत पुरंदर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुमारे साडेपाच हजार मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा सभेच्या अध्यक्षा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दांत मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेच्या सदस्या सौ. थोरात ताई यांनी ‘स्त्री-पुरुष एक समान सांगते आपले संविधान’ या विषयावर निवेदन वाचले. आभार प्रदर्शन व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील कार्यकारिणी सदस्य श्री. खंकाळ, सरचिटणीस त्रिंबक दादा लोखंडे, अध्यक्षा सौ. बाठेताई, सदस्य श्री. घोरपडे, राऊत तसेच महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती