सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
  • मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
  • राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
 शहर

महिला दिनापासून तुळशीबागेत ‘प्रेमाची हेमंत सावली; उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी छोटे व्यावसायिक असोसिएशनचा उपक्रम

डिजिटल पुणे    09-03-2026 15:37:49

पुणे : शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना,महिलांना  उन्हापासून दिलासा मिळावा या उद्देशाने  आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आणि छोटे व्यावसायिक असोसिएशन, तुळशीबाग यांच्या सहभागातून ग्रीन नेट लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘प्रेमाची हेमंत सावली’ या नावाने हा उपक्रम साकारण्यात आला  असून यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.महिला दिनाच्या निमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या सर्व माता-भगिनींना उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांना आरामदायी वातावरणात खरेदी करता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तुळशीबाग ही पुण्यातील ऐतिहासिक आणि सर्वाधिक वर्दळीची बाजारपेठ असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर महिला खरेदीसाठी येतात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याबाबत माहिती देताना नगर पथ विक्रेता समिती सदस्य सागर दहीभाते यांनी सांगितले की,तुळशीबाग परिसरात दररोज साधारण १० ते १२ हजार ग्राहक येत असल्याने ग्रीन नेटमुळे ग्राहकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळत आहे. सावलीमुळे बाजारपेठेतील वातावरण अधिक सुखद झाले असून व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही याचा लाभ होत आहे.ऐतिहासिक  तुळशीबाग परिसरात येणाऱ्या नागरिकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि खरेदी करताना त्यांना सोयीस्कर वातावरण मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. व्यापारी आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सातत्याने राबविता येत आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद तांदळे यांनी केले. यावेळी नगरसेविका स्वप्नाली पंडित, संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे,अमित कंक,नरेश तडका, सागर गुळुमकर, चकोर सुबंध,राजेश व्हावळ,परेश ठक्कर, नरेश माळवे,नितीन पंडित तसेच परिसरातील सर्व व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती