पुणे : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सुभाष वारे यांची एकमताने निवड झाली आहे.फाउंडेशनचे याआधीचे अध्यक्ष डॉ.जी.जी.पारीख यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. डॉ.जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाचे बैठकीस डॉ.मनिषा गुप्ते,ॲड.सुरेखा दळवी, किरण ठाकूर,ॲड.संतोष म्हस्के,चंद्रकांत निवगुने, साथी सुभाष वारे, मधू पाटील, आनंद थोरात, साथी सुभाष लोमटे इत्यादी विश्वस्त उपस्थित होते.ही बैठक दि.८ मार्च २०२६ रोजी झाली.डॉ. जब्बार पटेल आणि विश्वस्त कार्यकर्त्यांनी सुभाष वारे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले