सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर परिणाम; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘ECA’ कायदा लागू केला
  • महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘Come Early, Go Early’ योजना; सुनेत्रा पवारांची विधिमंडळात मोठी घोषणा
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 जिल्हा

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष – गृह राज्यमंत्री योगेश कदम

डिजिटल पुणे    10-03-2026 18:15:23

मुंबई : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अमरावती शहरात 2021 ते 2026 या कालावधीत ड्रग्ससंबंधित 29 गुन्हे नोंदवून 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच नागपूर गेट पोलीस ठाण्याने सुमारे 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ही त्यांनी दिली.

राज्यात स्थापन करण्यात आलेली अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स सक्रियपणे कार्यरत असून या पथकाला आवश्यक मनुष्यबळ व विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.ड्रग्सविरोधी कारवाया गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी केल्या जात असून या कारवाया सातत्याने आणि आक्रमकपणे सुरू राहतील, असे गृह राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती