सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
  • पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
  • : लायबेरियाचे झेंडे लावले, सिग्नल सिस्टीम बंद केली...; युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत दाखल
 जिल्हा

राज्यात उष्णतेचा कहर; १३-१४ मार्चला विदर्भ-मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

डिजिटल पुणे    12-03-2026 13:28:37

पुणे : महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान जाणवत आहे. विशेषतः किनारपट्टी भागात उकाड्यासह दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती जाणवत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता नसली तरी १३ आणि १४ मार्चदरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर यांसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. आज पावसाची शक्यता नसून काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा चढलेला आहे. १४ मार्चनंतर काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ सखाराम सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर पुणे येथे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, मुंबई आणि इतर किनारपट्टी भागातही तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास प्रदूषणामुळे धुक्यासारखी पातळ थर दिसून आला, मात्र यामुळे कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

सध्या गुजरात आणि महाराष्ट्र परिसरात प्रतिचक्रवर्ती परिस्थिती निर्माण झाल्याने उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे. त्यामुळे विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच १४ मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


 Give Feedback



 जाहिराती