सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं
  • : अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
  • सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
 जिल्हा

आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक – ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

डिजिटल पुणे    13-03-2026 16:05:44

मुंबई  : राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून तालुका व जिल्हा व्यवस्थापक विविध शासकीय अभियानांदरम्यान महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापकांच्या माध्यमातूनही अनेक कामे प्रभावीपणे पार पडत आहेत. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत कार्यरत तालुका, जिल्हा व ब्लॉक व्यवस्थापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

मंत्रालयात आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत कार्यरत तालुका, जिल्हा व ब्लॉक व्यवस्थापक संघटनेसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स्नेहल अडसूळ, सहायक कक्ष अधिकारी स्नेहा खोत तसेच आपले सरकार सेवा केंद्र ब्लॉक व्यवस्थापक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाशी संबंधित कंत्राटी कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या सेवेत सातत्य राहील आणि वेतनासंदर्भातील अडचणी निर्माण होणार नाहीत. तसेच संघटनेने मांडलेले विविध प्रश्न सकारात्मकतेने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 


 Give Feedback



 जाहिराती