सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं
  • : अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
  • सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
 शहर

कात्रजमध्ये पोलिसांची विशेष मोहीम; रिक्षाचालकांवर कारवाई, २४८ प्रकरणे नोंद

डिजिटल पुणे    14-03-2026 12:46:26

पुणे  :कात्रज परिसरात नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दिवसभरात एकूण २४८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने प्रवाशांकडून भाडे नाकारणे आणि जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचा समावेश आहे.

वाहतूक पोलिसांनी कात्रज बोगदा, कात्रज नाका, भारती विद्यापीठ परिसर आणि राजीव गांधी सर्प उद्यान या भागांत नाकाबंदी करून तपासणी केली. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

या कारवाईत भाडे नाकारण्याच्या ११६ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून सर्व प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आला आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या १११ रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली.याशिवाय गणवेश न घालता वाहन चालवणाऱ्या ११ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सिग्नल तोडणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

कात्रज नाका व बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या भाडे नाकारणे व इतर त्रासाच्या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे वाहतूक विभागाने ही मोहीम राबवली असून पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहतील, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती