सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके
  • गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
  • सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 शहर

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

डिजिटल पुणे    16-03-2026 10:41:24

पुणे : "आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!" अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. त्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशीही चर्चा करून मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली. "आण्णा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा त्याच उत्साहाने जनसेवेच्या कामात सक्रिय व्हा," अशी सदिच्छा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती