पुणे: 'सरकारच्या बदलत्या कामगार धोरणांमुळे कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांवर गदा ?" या विषयावर एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कामगार-कष्टकऱ्यांचे नेते साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हे राज्यव्यापी चर्चासत्र होणार आहे.ऊसतोड कामगार आणि साखर कामगारांचे भविष्य, असंघटित कष्टकऱ्यांच्या घामाची चोरी कधी थांबेल, कामगार विरोधी चार कामगार संहिता अशा विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.दि. १५ मार्च २०२६ रोजी स.९.३० ते संध्या. ५ या दरम्यान एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे हे चर्चासत्र होणार आहे.चर्चासत्रात सहभागासाठी उपेंद्र टण्णू - ९८८१७०१८८१राहुल भोसले - ९८२२९६२८५० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अँड. संजय वढावकर, तात्यासाहेब काळे,अँड. बस्तु रेगे, गोरख मेंगडे,अँड. संतोष म्हस्के, लुबना अनंतकृष्णन,विकास मगदूम, काशिनाथ नखाते, सुजाता पाटील भोंगाडे, जीवन राठोड, छाया पडघन,शैलजा आरळकर, साथी सुभाष लोमटे सहभागी होणार आहेत.