सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 विश्लेषण

राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका

डिजिटल पुणे    17-03-2026 11:31:08

पुणे: राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असताना हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या काळात महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्चदरम्यान कोकण वगळता राज्यातील बहुतेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह उत्तर कोकण पट्टा आणि नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

तापमानात चढ-उतार

विदर्भातील वाशिम येथे अलीकडेच ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात रात्री तापमान काही प्रमाणात खाली आले असले तरी ढगाळ वातावरणामुळे पुढील काळात उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

गारपीट आणि पावसाचा इशारा

१८ मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे पावसाचा अंदाज आहे. कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.

उकाडा कायमच

उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसाचे तापमान जास्त राहणार असून रात्री दमट हवामानामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकरी व नागरिकांसाठी सूचना

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन पिकांचे संरक्षण करावे. तसेच नागरिकांनी बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती