सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 शहर

पुण्यात वाहतूक बदल – महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे प्रमुख मार्गांवर निर्बंध

डिजिटल पुणे    17-03-2026 15:32:06

पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले असून, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने विशेष आदेश जारी केले आहेत. पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांच्या आदेशानुसार १८ मार्च २०२६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.

या कालावधीत पुणे-अहिल्यानगर (नगर) रोडवरील लोणीकंद ते खराडी बायपास दरम्यान तसेच या मुख्य मार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर सकाळी ९.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. यामध्ये ट्रक, डंपर, ट्रेलर, मिक्सर, कंटेनर यांसारख्या वाहनांचा समावेश आहे.

तसेच या मार्गांवर वाहने उभी करणे किंवा पार्किंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवांची वाहने, जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, पीएमपीएमएल व एसटी बसेस यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती