सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 क्राईम

पूर्व वैमनस्यातून खून करणाऱ्या तीन बालकांना पुण्यात २ तासांत ताब्यात; आरोपी किशोर खून प्रकरण उघड

डिजिटल पुणे    17-03-2026 18:02:34

पुणे – दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहराने पूर्व वैमनस्यातून एकमेकांना मारून खून करणाऱ्या तीन विधीसंघर्षीत बालकांना फक्त दोन तासांत ताब्यात घेतले आहे.सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा क्र. १०३/२०२६ नुसार, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान संशयितांच्या चेहरे ओळखले आणि ताबडतोब गोपनिय बातम्यादाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर, वनदेवी वनउद्यान जवळ तीन संशयित बालक आढळले.

सदर ठिकाणी पोलीसांची उपस्थिती दिसताच संशयित इसम पळून जावू लागले, त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले गेले. अधिक चौकशीत या बालकांनी कबुली दिली की, दि.१६/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता आनंदनगर, मारुती मंदिराजवळ सार्थक बंगला, अरविंद सोसायटी येथे किशोर गिरिष काशिद (वय १९) यांना धारदार शस्त्र व दगडाने मारून खून केले.

सदर तीन विधीसंघर्षीत बालकांना पुढील कारवाईसाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, उप पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ यांच्या पथकाने केली.

पथकातील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांचे सुचनांनुसार पोलीस अंमलदार अजित शिंदे, प्रदिप राठोड, साईकुमार कारके, अमित गद्रे, महेश पाटील, रविंद्र लोखंडे, बाळु गायकवाड, शिवाजी सातपुते तसेच महिला पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, विद्या प-हाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.


 Give Feedback



 जाहिराती