सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 जिल्हा

धाराशिवमध्ये अवकाळी पावसासह गारपीट; कलिंगड पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

डिजिटल पुणे    18-03-2026 13:24:04

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा जबर फटका बसला आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या कलिंगड पिकावर गारपिटीचा तडाखा बसल्याने संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, इतकी तीव्र गारपीट त्यांनी आयुष्यात प्रथमच अनुभवली. जमिनीवर तीन ते चार इंच जाडीचा गारांचा थर साचला होता, तर काही ठिकाणी लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. या गारांमुळे कलिंगडांना तडे गेले असून त्यामध्ये आतून सड सुरू झाली आहे.

या परिस्थितीत नुकसान झालेलं पीक बाजारात विक्रीसाठीही योग्य राहिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. आधीच खर्च केलेल्या पैशाचा परतावा मिळणं कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती