‘प्रयास – रोड सेफ्टी अवेअरनेस’ उपक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल अण्णासाहेब मगर महाविद्यालयास ‘बेस्ट कॉलेज अवॉर्ड’ने सन्मान
पुणे : प्रयास-(Promoting Road Awareness for Youth and Safety’)जग मंगल सोशल फाउंडेशन आणि स्वयं तेज अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोड सेफ्टी अवेअरनेस उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल ‘“बेस्ट कॉलेज अवॉर्ड” प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्काराचा स्वीकार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी आणि नोडल ऑफिसर अर्चना श्रीचिप्पा, अँबेसिडर व सेफ्टी क्लब विद्यार्थ्यांना यांनी स्वीकारला.तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे, नोडल ऑफिसर प्राध्यापिका अर्चना श्रीचिप्पा, अँबेसिडर व सेफ्टी क्लब विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.हा उपक्रम जगमंगल सोशल फाउंडेशन व स्वयं तेज अकॅडमी यांच्या पुढाकारातून व आयडीटीआर-पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोड सेफ्टी क्लबचे नोडल ऑफिसर कु. अर्चना श्रीचिप्पा, तसेच रोड सेफ्टी क्लबचे अॅम्बेसेडर्स व सदस्य यांच्या सहकार्यांने महाविद्यालयाने ६०५ विद्यार्थ्यांनी ४५ दिवस, ४५ तासांचा रोड सेफ्टी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला असून विविध कार्यशाळा, जनजागृती उपक्रम, सेफ्टी क्लबची स्थापना, सुरक्षा सर्वेक्षणे आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे युवकांमध्ये सुरक्षित व जबाबदार वाहतूक संस्कृती रुजविण्यात मोठा वाटा उचलला आहे.विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्व, शिस्त आणि रोड सेफ्टीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे सुरक्षित रस्ते आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या चळवळीला बळकटी मिळाली आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंग, ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी विभागप्रमुख एफ. एस. मखदूम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एनएसएस संचालक डॉ. गणेश भामे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालिका व राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, आयडीटीआरचे प्राचार्य संजय ससाणे, तसेच जगमंगल सोशल फाउंडेशनचे संस्थापक व ‘प्रयास’चे मुख्य मार्गदर्शक तेजस गुजराथी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या सन्मानामुळे महाविद्यालयाच्या कार्याची दखल घेतली गेली असून, भविष्यातही विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून हा रोड सेफ्टी कोर्स पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले.