सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 जिल्हा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    20-03-2026 14:43:27

नागपूर  : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो,’अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिल्या.श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समारोह समितीच्या वतीने नागपुरात लक्ष्मीनगर चौकात नववर्षदिनानिमित्त शोभायात्रा आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर या याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

तात्या टोपे नगरातील श्री गणेश मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर, ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी आणि इतर मान्यवरांसह महिलांचे ढोलपथक, रामायणातील पात्रांच्या वेशभुषा केलेले कलाकार तसेच मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून आपण सारे आपल्या नूतन संकल्पांची सुरुवात करतो आणि आपल्या जीवनाला सामोरे जातो. ही भारताची गुढी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही गुढी उंचच उंच जात राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी सामुहिक रामरक्षा पठण तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष संदीप जोशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 


 Give Feedback



 जाहिराती