सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 विश्लेषण

‘सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

डिजिटल पुणे    23-03-2026 12:16:27

मुंबई : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. “देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशीप” या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे.मॅगझिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून देश–विदेशातील मोठ्या वाचकवर्गात ती पोहोचली आहे. अभ्यासू, धडाडीच्या आणि लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन या विभागांत मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा या मुलाखतीत मांडण्यात आला आहे.

मॅगझिनच्या संपादिका अँड्रिया कोस्टबीर यांनी ही विशेष मुलाखत घेतली असून मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रवासातील विविध टप्पे व पैलू आकर्षक छायाचित्रांसह सादर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतीही या अंकात समाविष्ट आहेत.

स्पेशल एडिशनचे प्रकाशन रामटेक निवासस्थानी

शनिवारी संपादिका अँड्रिया कोस्टबीर आणि अशोक धामणकर यांनी रामटेक येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रवासाची झलक या अंकातून वाचकांसमोर येत आहे, ती नक्की वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती