सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 शहर

पुण्यात हडपसरमध्ये कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणी साचले; मगरपट्टा सिटीमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी

डिजिटल पुणे    23-03-2026 12:58:29

पुणे : हडपसर परिसरातील मगरपट्टा भागात सोमवारी (दि. २३ मार्च २०२६) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास कॅनॉलची भिंत अचानक फुटल्याची घटना घडली. यामुळे कॅनॉलचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले असून मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हडपसर वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, कॅनॉल फुटल्यामुळे पाण्याचा वेग अचानक वाढला आणि काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण झाला. घटनास्थळी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.

सध्या खडकवासला धरणातून कॅनॉलमध्ये सोडण्यात येणारे पाणी तात्पुरते थांबवण्यात आले आहे, मात्र रस्त्यावर साचलेले पाणी निघून जाण्यास अंदाजे चार ते पाच तास लागणार आहेत. मगरपट्टा सिटीमध्ये देखील पाणी घुसल्याचे समोर आले आहे.

हडपसर वाहतूक विभागाने मुंढवा ते मगरपट्टा परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आणि वाहतूक विभाग घटनास्थळी तैनात असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे देखील सांगण्यात आले आहे.पण, उन्हाळ्यात पाण्याची गंभीर कमतरता असतानाच पुण्यातील रस्त्यांवर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.


 Give Feedback



 जाहिराती