सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 DIGITAL PUNE NEWS

संगीतामुळे जगणे सुंदर होते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    23-03-2026 14:48:01

नागपूर : संगीतकार आणि गायकांनी आपले जगणे सुंदर केले, इतकी शक्ती संगीतात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.देशातील महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना पुरस्काराचा समावेश होतो, असेही मुखमंत्र्यांनी सांगितले.

वारकरी परंपरेतील अभिजात संगीत आणि शास्त्रीय गायनावर हुकूमत गाजविणारे युवा कलाकार शरयू दाते, ऋषिकेश करमरकर यांना यावेळी गौरविण्यात आले. याशिवाय प्रसिद्ध पार्श्वगायक शान यांना आयकॉन, प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडित अजय पोहनकर यांना लेनंड, तर बालप्रतिभा पुरस्कार निशांत गुप्ता यांना देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  पार्श्वगायक रुपकुमार राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा होते.

याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रीयन ऑफ इयर आउटस्टँडिंग पॉलिटिशियन या पुरस्काराने गौरविण्यात आले.मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती