पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा भयंकर हल्ला समोर आला आहे. राजगुरुनगर शहरात घडलेल्या या घटनेत एका कुत्र्याचा मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर राजगुरुनगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले आणि नागरिक घराबाहेर जाण्यास भीती व्यक्त करत आहेत. नागरिकांची संतापाची भावना वाढताना दिसून येत असून, नगरपरिषदेकडून भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी ठोस उपाययोजना न केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे हल्ले यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, आणि नागरिक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत आहेत.