सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 जिल्हा

कोल्हापूर : ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांवर मारहाण; ग्रामस्थांनी काढली निषेध फेरी

डिजिटल पुणे    23-03-2026 18:02:39

कोल्हापूर – जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर परिसरात काल धक्कादायक घटना घडली. परिते गावातील काही भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असताना, 15 ते 20 पुजाऱ्यांनी त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळही फोडल्याचे दिसते.

सध्या कोडोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात 15 पुजारी आणि 15 भाविकांचा समावेश आहे. घटनास्थळी परिते गावातील नागरिकही आक्रमक झाले आणि त्यांनी या घटनेचा निषेध करत गावात फेरी काढली.

परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले की, काही नागरिकांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप खोडून काढत, ही मारहाण पुजाऱ्यांकडून सुरू करण्यात आली. घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे, तसेच मंदिरातील शांतता आणि पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे विशेष लक्ष देत तपास करत आहे आणि योग्य कारवाई करण्याची तयारी करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती