सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 जिल्हा

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता;राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    25-03-2026 15:11:21

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित आदी उपस्थित होते.बैठकीत सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी केले. बैठकीस सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती