उरण : नराधम, अत्याचारी, स्वयं घोषित ज्योतिष अशोक खरात यांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची व अशा दोषी व्यक्ती वर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (श्री शरदचंद्र पवार गट )रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
राज्यभरात असणाऱ्या धर्मगुरू कीर्तनकार साधू महाराज यांच्यापासून सर्वांनी सावधानता पाळावी, यातील सर्वच लोक वाईट आहेत असतात मला म्हणायचं नाही. परंतु विषाची परीक्षा घेऊ नका आपल्या कुटुंबातील आई बहिण पत्नी मुलगी यांना या महाराजांच्या सानिध्यात पाठवू नका, धर्म शिकवण सत्संग हे किमान पाचशे मीटर दूर राहून करा, महाराजांनी दिलेले तीर्थ अंगारे धुपारे प्राशन करू नका,
महाराष्ट्रातील जनतेची परिस्थिती मेंढरा सारखी झाली आहे. आपला पुढारी आपला मंत्री साधू महाराजांच्या कार्यक्रमाला गेला बाबाच्या पाया पडला की त्या पाठोपाठ त्या नेत्याला मानणारा संपूर्ण वर्ग हा बाबाचा शिष्य बनतो. म्हणून राज्यातील नेत्यांनी मंत्र्यांनी आपण कोणत्या बाबाच्या पाया पडत आहोत याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला फॉलो करणारी आपले रयत आहे आपण फसलो तर रयत फसणार आहे याची जाणीव राज्यातल्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी ठेवली पाहिजे. ढोंगी आघोरी भोंदू बाबांचे महत्व खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांनीच ह्या महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जनतेने देखील अशा नेत्यांपासून दूर राहिलं पाहिजे
महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी विचारांचा राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आज वेगळ्या मार्गाने चालल्याचे पाहायला मिळत आहे. अशी खंत जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.