सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लॉकडाऊनच्या अफवा फेटाळल्या; राज्यात इंधनाचा पुरेसा साठा;फेक व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवरही होणार कायदेशीर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट माहिती
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 क्राईम

पुण्यात विविध ठिकाणी गुन्ह्यांची मालिका; मारहाण, फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड

डिजिटल पुणे    27-03-2026 12:41:39

पुणे : पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात मारहाण, फसवणूक, ऑनलाइन ठगी आणि चोरीच्या घटनांचा समावेश असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.मोहम्मद हुसैन अत्तार (वय 34, रा. कोंढवा) याने जुन्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय, कोंढवा परिसरात एका 17 वर्षीय मुलावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली असून यामध्येही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन माध्यमातून गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून एका व्यक्तीकडून सुमारे 1.87 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच मोबाईल विक्रीच्या बहाण्यानेही नागरिकांची फसवणूक झाल्याची नोंद आहे.दरम्यान, बस प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. प्रवास करताना अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती