सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
  • दारूमुळे गावाचा समतोल बिघडला; दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, लग्नांवरही परिणाम
  • भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी
 जिल्हा

दारूमुळे गावाचा समतोल बिघडला; दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, लग्नांवरही परिणाम

डिजिटल पुणे    28-03-2026 11:46:43

बेळगाव: सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावात वाढत्या मद्यप्राशनामुळे सामाजिक वातावरण ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. गावातील पुरुष आणि तरुण मोठ्या प्रमाणात दारूच्या व्यसनात अडकत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याचा थेट परिणाम गावातील विवाह व्यवस्थेवरही होत असून बाहेरील गावांतील लोक मुली देण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येत दारूविक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. गावातील अधिकृत दारू दुकान तात्काळ बंद करण्यात यावे तसेच इतर ठिकाणी सुरू असलेली बेकायदेशीर मद्यविक्री रोखावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील पुरुष आणि तरुण मंडळी दारूच्या आहारी गेल्यामुळे संपूर्ण गावाचं वातावरण बिघडलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, इतर गावातील लोक आता 'दारू दुकान बंद करा, मगच मुलगी देतो' असं स्पष्ट सांगत असल्याने अनेकांची लग्नंही होत नाहीत. त्यामुळे आता गावातील महिलांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलं. याच पार्श्वभूमीवर चचडी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत गावातील दारू दुकान तात्काळ बंद करावी आणि इतर दुकानांमधून सुरू असलेली बेकायदेशीर मद्यविक्री थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.: तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढल्यानं या गावात कुणीही लग्नासाठी मुली द्यायला तयार होत नसल्यानं सामाजिक स्तरावर फटका बसत असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे. 

महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत परिस्थितीचे गांभीर्य मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.महिलांच्या म्हणण्यानुसार, अनेक पुरुष सायंकाळनंतर दारूच्या आहारी जात असून काहीजण घरातील वस्तू विकूनही दारू मिळवतात. त्यामुळे कुटुंबात वाद, भांडणं आणि महिलांवरील अत्याचार वाढल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, पुरुष कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेती आणि घराची जबाबदारी महिलांवर येत आहे.

गावात अधिकृत दुकानासोबतच बेकायदेशीर मद्यविक्री वाढल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका अधिक वाढल्याचेही महिलांनी नमूद केले आहे.दारूच्या या समस्येमुळे गावाची प्रतिमा मलिन झाली असून लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. “दारू बंद करा, मगच संबंध जोडू,” असा स्पष्ट संदेश बाहेरील गावांकडून दिला जात असल्याने अनेक तरुणांचे विवाह प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे.


 Give Feedback



 जाहिराती