सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
  • अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
  • भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
 क्राईम

अशोक खरात प्रकरणात SIT पुन्हा सक्रिय; पीडित महिलेसह घटनास्थळी तपास, धक्कादायक माहिती समोर

डिजिटल पुणे    30-03-2026 15:04:16

नाशिक: स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेगाने पुढे जात असून, विशेष तपास पथक (SIT) आणि फॉरेन्सिक टीमने आज कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात पुन्हा भेट दिली. यावेळी एका पीडित महिलेलाही सोबत घेऊन घटनास्थळी तपास करण्यात आला.

तपासादरम्यान, संबंधित महिलेकडून नेमक्या जागा आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली. या कार्यालयातच अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याबाबत अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही दोन वेळा या ठिकाणी तपासणी करण्यात आली होती.

दरम्यान, न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून, तो आता १ एप्रिलपर्यंत पोलीस ताब्यात राहणार आहे. या प्रकरणात लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीचेही आरोप असून, तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या पीडित महिलाही पुढे येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनत आहे.

SIT कडून खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून, त्याच्या संस्थांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्ता, जमीन आणि व्यावसायिक ठिकाणांची माहितीही तपासली जात आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत. विशेष म्हणजे, मोबाईलमध्ये सुमारे अडीच हजारांहून अधिक संपर्क क्रमांक कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.सध्या SIT कडून कसून चौकशी सुरू असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती