सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती; आजच पदभार स्वीकारणार
  • मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
  • राज्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  • अशोक खरातच्या लेकीची लग्नपत्रिका, एकनाथ शिंदे, चाकणकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांचं नाव!
 जिल्हा

मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे; आजच पदभार स्वीकारणार

डिजिटल पुणे    31-03-2026 15:40:12

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने परिपत्रक जारी करून अधिकृतपणे त्यांचे नाव घोषित केले आहे. अश्विनी भिडे आजच महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. या नियुक्तीसह त्या मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.

अश्विनी भिडे यांना त्यांच्या प्रशासकीय कामगिरीसाठी “मेट्रो वूमन” म्हणून ओळखले जाते. आयुक्तपदापूर्वी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

अश्विनी भिडे यांची कारकीर्द

अश्विनी भिडे 1995 मध्ये महाराष्ट्र कॅडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या.

त्यांनी कोल्हापुरातून प्रशासकीय कामगिरीची सुरुवात केली; 1997 ते 1999 या काळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले.

त्यानंतर सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा दिली.

त्यांच्या 27 वर्षांच्या कारकिर्दीत अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांचे संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले.

2015 मध्ये मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाची धुरा त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली; मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहिल्या आणि यामुळे त्यांना “मेट्रो वूमन” म्हणून ओळख मिळाली.

डिसेंबर 2024 पासून त्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

अश्विनी भिडे यांची निवड महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये आणि शहराच्या विकास योजनांमध्ये त्यांच्या अनुभवाचा परिणाम असल्याचे मानले जाते.


 Give Feedback



 जाहिराती