सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती; आजच पदभार स्वीकारणार
  • मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
  • राज्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  • अशोक खरातच्या लेकीची लग्नपत्रिका, एकनाथ शिंदे, चाकणकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांचं नाव!
 जिल्हा

धक्कादायक प्रकार! सातारा सिव्हिलमध्ये मृतदेहांची अदलाबदल; अंत्यसंस्कारानंतर उघडकीस, नातेवाईक संतप्त

डिजिटल पुणे    31-03-2026 17:51:36

सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला असून, मृत व्यक्तींनाही सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यानंतर रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे चुकीच्या पद्धतीने सुपूर्द झाल्याचे उघड झाले.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली. यातील एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि संबंधित कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मृतदेह देताना चेहरा दाखवण्यास नकार देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. चुकीचा मृतदेह दिल्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले आहे. तसेच, प्रक्रियेनुसार मृतदेह हस्तांतरण करताना नातेवाईकांच्या सह्या घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या धक्कादायक प्रकारामुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती