सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 क्राईम

आळंदी दुहेरी हत्याकांड उलगडलं; सोशल मीडियातून झालेल्या नात्यातील वादातून संशयिताकडून टोकाचं पाऊल

डिजिटल पुणे    04-04-2026 11:08:54

आळंदी : आळंदी परिसरात उघडकीस आलेल्या सहा वर्षीय मुलगी आणि ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या दुहेरी हत्येचा तपास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने काही तासांतच उलगडला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (३१) याला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, कौटुंबिक वाद आणि संशयातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये धनश्री केदारी (६) आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (७०) यांचा समावेश आहे. घटनेच्या वेळी धनश्रीची आई संगीता केदारी या कामानिमित्त बाहेर होत्या. त्यामुळे धनश्री शेजारील शिंदे यांच्या घरी होती.

प्राथमिक तपासानुसार, आरोपीला आपल्या पत्नीविरुद्ध शेजारी भडकवत असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने प्रथम वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्यानंतर ओळख उघड होऊ नये या भीतीतून मुलीचाही जीव घेतल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आरोपी आणि संगीता केदारी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी विवाह केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात मतभेद वाढले होते आणि आरोपी वेगळा राहत होता, अशी माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.या घटनेमुळे आळंदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती