सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल पुणे    04-04-2026 14:48:31

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या पांडवलेणी येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी व परिसराची पाहणी केली. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उप वनसंरक्षक (पूर्व) राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, वन प्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक सुजित नेवसे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता हेमंतकुमार हुकरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धन संतोष महाजन, अभ्यासक रमेश पडवळ, पुरतत्व विद्यावेता धनश्री निगुडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री अग्रवाल यांनी पाहणी दरम्यान अभ्यासकांकडून लेण्यांचा इतिहास जाणून घेत २२ गुंफाची पाहणी केली. लेणी परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, संवर्धन व पर्यटन विकासाच्या कामांचा आढावा घेतला. परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवेशमार्ग, पायऱ्या, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे व माहितीफलक यांची पाहणी करून मार्गदर्शक सुचना केल्यात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या  सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करताना पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लेणी परिसरात पार्किंग व्यवस्था, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यानी यावेळी दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती