सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान, बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती : छत्रपती संभाजीराजे
  • मैदानावर रक्ताचा सडा! रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने वार करून संपवलं; क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणारी घटना
  • बारामती पोटनिवडणुकीत रंगत वाढली; “एक मत हीच खरी श्रद्धांजली” – रोहित पवारांचे भावनिक आवाहन
  • ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
 क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेट उघड; शाळेसमोरच चालत होता धंदा, दोन बहिणी अटकेत

डिजिटल पुणे    06-04-2026 16:20:37

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सातारा परिसरात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेसमोरच हा धंदा सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन सख्ख्या बहिणींसह एका पुरुषाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय विवाहित महिलेला गर्भपातासाठी तिचा पती आणि नणंद घेऊन आले होते. याबाबत आधीच खबर मिळाल्याने पथकाने सापळा रचून छापा टाकला आणि संबंधितांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या रॅकेटची मुख्य सूत्रधार ज्योती पवार ही जीएनएम नर्स असून ती पोर्टेबल मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग तपासणी करत होती. सुमारे 15 हजार रुपयांत हा बेकायदेशीर व्यवहार चालत असल्याचे उघड झाले. गर्भ मुलीचा असल्यास औषधांच्या मदतीने गर्भपात केला जात होता, तर काही प्रकरणांत महिलांना इतर ठिकाणी पाठवून अधिक पैसे उकळले जात होते.

दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच मुख्य आरोपी नर्स घटनास्थळावरून फरार झाली असून तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपींवर पीसीपीएनडीटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, तसेच हे जाळे किती मोठे आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती