सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या, DCP आणि ACP दर्जाच्या अधिकारी आवडत्या पोस्टिंगसाठी बाबाकडे गेल्याची चर्चा
 क्राईम

अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे; दोन महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाच्या कक्षेत?

डिजिटल पुणे    07-04-2026 12:47:10

नाशिक : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका आयएएस अधिकाऱ्यानंतर आता दोन महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांचा खरातशी संपर्क होता.

या दोन अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची असल्याची चर्चा आहे. आवडत्या ठिकाणी पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी खरातचा संपर्क साधला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच त्यांच्या आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली स्वतः अशोक खरात याने दिल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना फसवण्यासाठी तथाकथित ‘विज्ञान’ किंवा ‘चमत्कार’ यांचा आधार घेतल्याचा दावा तो करत होता. मात्र प्रत्यक्षात हे सर्व हातचलाखीचे प्रकार असल्याचे त्याने चौकशीत मान्य केल्याचे समजते. या प्रकारात इतर कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.

तपासादरम्यान खरातच्या कुटुंबीयांचीही चौकशी होणार आहे. त्याचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटीच्या संपर्कात आला असून मुलगा आणि मुलगी या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र त्याची पत्नी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. आज त्याच्या पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असून उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. तपासातील आतापर्यंतच्या घडामोडी आणि पुढील दिशा याबाबत त्या माध्यमांना माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती