सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
  • अजितदादांचा अपघात की घातपात? भोंदू अशोक खरातच्या अघोरी पूजेचं कनेक्शन; जानेवारीतील CDR ठरणार कळीचा पुरावा, अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत
  • मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
  • मोठी बातमी: दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या, DCP आणि ACP दर्जाच्या अधिकारी आवडत्या पोस्टिंगसाठी बाबाकडे गेल्याची चर्चा
 राज्य

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

डिजिटल पुणे    07-04-2026 16:52:11

पणजी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल  पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत असून  देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नाव नोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्ष यांचेकडे करावी.

यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, "गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत."

 


 Give Feedback



 जाहिराती