सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
  • अजितदादांचा अपघात की घातपात? भोंदू अशोक खरातच्या अघोरी पूजेचं कनेक्शन; जानेवारीतील CDR ठरणार कळीचा पुरावा, अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत
  • मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
  • मोठी बातमी: दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या, DCP आणि ACP दर्जाच्या अधिकारी आवडत्या पोस्टिंगसाठी बाबाकडे गेल्याची चर्चा
 क्राईम

धाराशिवमध्ये थरारक दुहेरी खून; पतीने पत्नी व ८ वर्षांच्या मुलीचा जीव घेतला, स्वतःहून पोलिसांत हजर

डिजिटल पुणे    07-04-2026 17:21:16

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बेरडवाडी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नी आणि अवघ्या ८ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित वासुदेव असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी लिंबाबाई आणि मुलगी मानसी यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांचा जीव घेतला. या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुहेरी हत्येनंतर आरोपी स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिस सर्व अंगांनी तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती