कर्नाटक : अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या FIR च्या अनुषंगाने पुढील तपासाबाबत आज राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेण्यात आली. या भेटीत प्रकरणाच्या तपासाच्या गती आणि दिशेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित FIR पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दाते यांनी दिली. मात्र, तपास आणि चौकशी या शाब्दिक फरकात प्रकरण अडकू नये, यावर विशेष भर देण्यात आला.
सदानंद दाते यांची स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी म्हणून ओळख असल्याने या गुन्ह्याचा FIR च्या आधारे सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, सध्या तपास अपेक्षित वेगाने आणि योग्य दिशेने होत नसल्याचे निरीक्षण मांडत, या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंतीही त्यांच्याकडे करण्यात आली.
