पुणे : धायरी परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत नगरसेविका कोमलताई सारंग नवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात, एक्सिस बँक समोरील लेन, धायरी फाटा, वडगाव खुर्द येथे होणार आहे.या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी, मोबाईल नंबर लिंक करणे, नाव, जन्मतारीख व पत्ता दुरुस्ती तसेच केवायसी अपडेट अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शिबिरासाठी येताना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. ओळख पुराव्यासाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शासकीय फोटो ओळखपत्र आवश्यक आहे. पत्ता पुराव्यासाठी पासपोर्ट, बँक पासबुक किंवा स्टेटमेंट, वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड किंवा भाडे करार यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल. जन्मतारीख दुरुस्तीसाठी जन्म प्रमाणपत्र, दहावीचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक राहील.लहान मुलांसाठी (० ते ५ वर्षे) जन्म प्रमाणपत्र आणि पालकांचे आधार कार्ड अनिवार्य आहे.
शिबिराबाबत अधिक माहितीसाठी 9358791010 किंवा 9304101010 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Google location -
https://maps.app.goo.gl/wVmKmTtSwUzJksNP7?g_st=ic
प्रत्येक सेवेसाठी शासनाने निश्चित केलेली फी लागू राहणार आहे.या उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मा. नगरसेवक श्री बाळासाहेब नवले आणि नगरसेविका सौ. कोमल सारंग नवले यांनी केले आहे.