दहिवडी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने ४ मे रोजी गोवा येथे आयोजित अधिवेशनासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना दहिवडी येथे औपचारिक निमंत्रण देण्यात आले.या प्रसंगी राज्य महासचिव विकास भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सहसचिव लिंगराज साखरे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, माण तालुकाध्यक्ष नितीन वाघमोडे, महिला आघाडीच्या सोनाली माने, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख एकनाथ वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष जावेद मुलानी आणि खजिनदार संदीप जठार उपस्थित होते.निमंत्रण स्वीकारताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राजा माने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी राजा माने यांनी गोवा येथे होणाऱ्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली.