सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
 जिल्हा

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची वाडीबंदर परिसरात मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

डिजीटल पुणे    11-04-2026 10:56:45

मुंबई : मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नागरी पुरवठा नियंत्रक, शिधावाटप व संचालक चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांच्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.या मोहिमेत वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्यांसह ४५१ सिलिंडर असा एकूण ४०,६१,७१६ /- रुपये किमतीचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील.या मोहिमेसाठी उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी) गणेश बेल्लाळे आणि उपनियंत्रक शिधावाटप (परिमंडळ ‘अ’) माधुरी शिंदे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली तसेच स. शि. अ. प्रदीप यादव यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात सापळा रचण्यात आला.

कारवाई पथकात भूपेंद्र गवळी, महेश देशपांडे, राहुल साळुंखे, अभिजीत गोराणे, विश्वजित गडकरी, नानासो रणदिवे, सचिन बोरसे, अनिकेत जवळकर, विकास उभे, जितेंद्र घोलप, नामदेव पडूळकर, राहुल कोळी, महेश होळकर आणि आशिष राऊत यांचा सहभाग होता.

 


 Give Feedback



 जाहिराती