धायरी (पुणे) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त धायरी गावात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. श्री धारेश्वर महादेव संस्थान धायरी, श्रीमंत श्री धारेश्वर तरुण मंडळ धायरी तसेच समस्त धायरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला
यावेळी श्री मळाई माता मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक सुधारणा, शिक्षण प्रसार आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.
यावेळी मा सुरेश गायकवाड, पंढरीनाथ रायकर, रवींद्र रायकर ,अतुल रायकर, कालिदास रायकर, सोमनाथ रायकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, कामगार नेते दिलीप रायकर व श्रीकृष्ण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. विविध क्षेत्रातील नागरिक, तरुण मंडळाचे सदस्य आणि महिला वर्गही मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी फुले दांपत्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आणि त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून, धायरी गावातील सामाजिक एकजूट आणि महापुरुषांविषयीचा आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला.