सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 क्राईम

नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण: न्यायालयीन कोठडी कायम, मारहाणीबाबत तक्रार नाकारली

डिजिटल पुणे    13-04-2026 15:57:00

नाशिक: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याला आज (13 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असून, उद्या पुन्हा त्याची न्यायालयात हजेरी लावली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना खरात लंगडत चालताना दिसला होता. तसेच अंगात ताकद नसल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र, आज सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांकडून मारहाण झाली का, अशी विचारणा केल्यावर त्याने कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीची ओळख पटवून घेतली आणि तपास अधिकाऱ्यांनी चौथ्या गुन्ह्यातही ताबा मिळवण्याची परवानगी मागितली. सरकारी वकिलांनी तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत चौथ्या गुन्ह्यासाठी ताबा देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून, पुढील प्रक्रिया म्हणून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील सक्रिय झाले असून नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत तपास सुरू असून, खरातच्या नावाशी संबंधित सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या खात्यांमधून 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

याशिवाय, आयकर विभागाकडूनही नाशिकमधील त्याच्या निवासस्थानी तपास करण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि निधीचे स्रोत यांची सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात आरोपीची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच घरगुती कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असली तरी अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.


 Give Feedback



 जाहिराती