सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 जिल्हा

यवतमाळमध्ये भीषण अपघात; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

डिजिटल पुणे    15-04-2026 12:36:15

यवतमाळ  : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-घाटंजी मार्गावर साखरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ट्रक आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत साईकिरण गुरगुल्ला आणि त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का गुरगुल्ला या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या या अपघातात कार पूर्णपणे चकनाचूर झाली. हा परिवार आंबेडकर जयंतीनिमित्त साखरा येथे आला होता. कार्यक्रमानंतर ते आदिलाबादकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सणाच्या दिवशीच घडलेल्या या अपघाताने शोककळा पसरली आहे.


 Give Feedback



 जाहिराती