उरण : १४ एप्रिल २०२६ रोजी ओएनजीसी उरण संयंत्र येथे अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एन. अहमद- जीजीएम/प्लांट मॅनेजर, ओएनजीसी उरण प्लांट, यांनी शूर शहीदांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहताना शोक शस्त्र पार पाडण्यात आले आणि ०२ मिनिटे मौन पाळण्यात आले.हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सप्ताहाची औपचारिक घोषणा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. या वर्षासाठी ठरवलेली थीम स्पष्ट करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अग्निसुरक्षेचे महत्त्व वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत अग्निसुरक्षेबद्दल जागरूकता पसरवणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.यावेळी राजेश कुमार आर्य, कमांडंट, सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबई, लोकेश चंद डेप्युटी कमांडंट फायर, सरद सोनकर सीजीएम एचएसई, हिमांशू शेखर साहू जीएम फायर सर्व्हिस, विभाग प्रमुख इन्फोकॉम, एचआर ऑपरेशन, मेंटेनन्स आणि ओएनजीसीचे इतर अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी शहीद इराणा नायक वाटिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एस.एन. अहमद- जी जी एम /प्लांट मॅनेजर, ओ एन जी सी उरण प्लांट, राजेश कुमार आर्य कमांडंट सी आय एस एफ युनिट ओएनजीसी मुंबई यांच्या उपस्थितीत झाला.शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाला हिरवा झेंडी दाखवून अग्निशमन सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.