मुंबई :लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 आता अंतिम लढत असून, केवळ उत्सुकता शिगेला पाहिली आहे. एकाच दिवशी चाललेल्या या प्रवासाचा शेवट आता भव्यदिव्य फिनाले होणार आहे जवळपास शंभर दिवसांच्या रोमांचक प्रवासानंतर ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात रंगलेल्या या पर्वाचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, सध्या सर्वांचं लक्ष ग्रँड फिनालेकडे लागलं आहे.
या सिझनमधील टॉप 5 स्पर्धक—राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन—हे अंतिम विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक स्पर्धकाने घरात आपल्या खेळ, स्वभाव आणि रणनीतीच्या जोरावर वेगळी छाप पाडली आहे. मैत्री, वाद, भावना आणि अनपेक्षित ट्विस्ट्समुळे हा सिझन प्रेक्षकांसाठी खास ठरला.
ग्रँड फिनालेचा सोहळा 19 एप्रिल रोजी होणार असून, रात्री 8 ते 11 या वेळेत त्याचे थेट प्रक्षेपण होईल. या विशेष कार्यक्रमात टॉप 5 स्पर्धकांचे खास परफॉर्मन्स, घरातील गाजलेले क्षण आणि काही सरप्राइज अॅक्ट्स पाहायला मिळणार आहेत. याशिवाय, बाहेर पडलेल्या स्पर्धकांचेही विशेष सादरीकरण या सोहळ्याची रंगत वाढवणार आहे.
अभिनेता रितेश देशमुख यांचाही खास परफॉर्मन्स या संध्याकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे फिनाले केवळ विजेत्याच्या घोषणापुरता मर्यादित न राहता एक मोठा मनोरंजन सोहळा ठरणार आहे.
आता प्रश्न एकच—या पाच जणांमधून कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी 6’चा विजेता? याचे उत्तर 19 एप्रिलला मिळणार असून, त्या क्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.