सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 DIGITAL PUNE NEWS

अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं केले कौतुक

डिजिटल पुणे    16-04-2026 16:01:11

मुंबई : नारीशक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन होत असून, महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दादर येथे आयोजित नारीशक्ती महिला संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिलांच्या अधिकारांबाबत आपले मत मांडत सरकारच्या प्रयत्नांचे समर्थन केले.

प्राजक्ता माळी म्हणाली की, महिलांना समान संधी आणि अधिकार मिळण्यासाठी समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे. सरकारकडून महिलांच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे तिने स्वागत केले. “महिलांनी केवळ मागण्या करण्यापेक्षा स्वतःची क्षमता सिद्ध करण्यावर भर द्यायला हवा,” असे मत तिने व्यक्त केले.

तिने समाजातील महिलांविषयी असलेल्या दुहेरी दृष्टिकोनावरही भाष्य केले. “आपण महिलांना देवी मानतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्यावर टीका आणि दबाव टाकतो. महिलांना पुढे नेण्यासाठी पुरुषांनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी,” असे ती म्हणाली.

दरम्यान, चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले. हे प्रकरण संवेदनशीलतेने आणि कठोरतेने हाताळल्याचे ती म्हणाली. “गरजेनुसार कठोर निर्णय घेणे आणि तितक्याच समजुतीने परिस्थिती हाताळणे, ही त्यांची शैली शिकण्यासारखी आहे,” असेही तिने नमूद केले.तसेच, सार्वजनिक जीवनात टीका-टिप्पणी होत असतानाही संयम राखण्याची त्यांची पद्धत उल्लेखनीय असल्याचे सांगत, राजकीय नेतृत्वाने अशा गुणांचा आदर्श घ्यावा, असेही प्राजक्ता माळीने स्पष्ट केले


 Give Feedback



 जाहिराती