सिल्वासा (गुजरात) – पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरातील आर्या योगिता महेश नाचण हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्राचा झेंडा गुजरातमध्ये फडकवला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या CBSE बोर्ड परीक्षा 2026 च्या निकालात, माऊंट लिट्रेर झी स्कूल, नारोली (सिल्वासा) येथून शिक्षण घेत असलेल्या आर्याने Artificial Intelligence या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत शाळेत अव्वल स्थान पटकावले आहे.
एकूण 93.20 टक्के गुणांसह आर्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, विशेषतः AI विषयातील परिपूर्ण गुणांमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक नगरीतून दूर सिल्वासा येथे जाऊनही तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवून शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.


आर्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.