सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 शहर

बाणेर वसतिगृह टेंडरवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये वाद; ‘टक्केवारी’ आरोपांमुळे प्रकरण तापले

डिजिटल पुणे    17-04-2026 18:40:13

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात झालेल्या वादामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे.

१५ एप्रिल २०२६ रोजी मनपा भवनात झालेल्या या वादात दोन्ही महिला लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणी आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, बाणेर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये ‘टक्केवारी’ (कमिशन) मागितल्याचा आरोप रोहिणी चिमटे यांच्यावर करण्यात आला आहे. माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी आरोप केला आहे की, ठेकेदारावर दबाव टाकून काम रोखले जात असून यामागे आर्थिक व्यवहारांचा मुद्दा आहे.

याशिवाय, संबंधित काम निकृष्ट दर्जाचे होत असून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्थायी समिती सदस्य पदाचा गैरवापर करून कामात अडथळे निर्माण केल्याचाही मुद्दा तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

महापालिका भवनात उघडपणे झालेल्या या वादामुळे मनपाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही नगरसेविकांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बाणेर येथील वसतिगृहाचे काम सध्या ८५ ते ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या वादामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती