नवी दिल्ली : महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. मतदानादरम्यान विधेयकाच्या समर्थनात 298 तर विरोधात 230 मते पडली. त्यामुळे हे विधेयक अपयशी ठरले.
या विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा रंगली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान महिलांच्या भूमिकेवर भाष्य करताना एक हलकाफुलका उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांकडून काही ना काही शिकायला मिळते—आई, बहीण किंवा पत्नीमार्फतही. मात्र, पंतप्रधान आणि माझ्या बाबतीत पत्नीचा मुद्दा लागू होत नाही, असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले.त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनीही या क्षणाचा आनंद घेतला.दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हे विधेयक मंजूर न होणे ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सरकारवर मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा या विधेयकाशी जोडण्याचा आरोपही केला.
महिला आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिल्याने पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी महिलांच्या योगदानावर भाष्य करताना सांगितलं की, प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. आई, बहीण किंवा पत्नी या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असं त्यांनी नमूद केलं. मात्र, पंतप्रधान आणि स्वतःच्या बाबतीत पत्नीचा संदर्भ लागू होत नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. या वक्तव्यावर सभागृहातील सदस्यांनी हसून प्रतिक्रिया दिली.
या चर्चेत किरेन रिजिजू यांच्यासह अनेक खासदारांनी सहभाग घेतला. महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना विषयावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, या विधेयकाच्या अपयशानंतर देशभरात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.