पुणे : जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील महाराणा प्रताप बाग येथे महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमास कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेवक बापू दादा मानकर, कुणाल टिळक, अजय खेडेकर, नगरसेविका स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, कसबा उत्तर मंडल अध्यक्ष अमित कंक, राकेश चौधरी, राजेंद्र आलमखाने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजात महत्त्व अधोरेखित केले. पुणे शहरात विविध ठिकाणी बसवेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
